वाशी, चेंबूर येथे डोंगर उतारावर राहणाऱ्यांना धोक्याचा इशारा! हानी टाळण्यासाठी स्थलांतरित होण्याचे आवाहन

‘एम पूर्व’ विभागांतर्गत झोपड्यातील, इमारतीतील रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे
वाशी, चेंबूर येथे डोंगर उतारावर राहणाऱ्यांना धोक्याचा इशारा! हानी टाळण्यासाठी स्थलांतरित होण्याचे आवाहन

डोंगर उतारावर राहणाऱ्यांना पावसाळ्यात भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एम पूर्व अर्थात चेंबूर वाशी नाका परिसरातील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिकेच्या एम पूर्व विभागाने केले आहे.

दरम्यान, ‘एम पूर्व’ विभागातील गौतमनगर, पांजरापोळ, ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजारा तांडा, हशू अडवाणी नगर, रायगड चाळ, विष्णू नगर, भीमटेकडी, भारत नगर, वाशी नाका या ठिकाणच्या टेकडीच्या/डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना आवाहन करण्यात येते की, पावसाळ्यादरम्यान जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची, तसेच पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असते. या भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याचीही शक्यता असल्यामुळे या भागातील धोकादायक इमारतींना/झोपड्यांना ‘एम पूर्व’ विभाग कार्यालयातर्फे सावधगिरीच्या व सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘एम पूर्व’ विभागांतर्गत झोपड्यातील, इमारतीतील रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नसल्याची कृपया नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त ‘एम पूर्व’ विभाग कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in