दिव्याखालीच अंधार! नियमावली डावलून पालिका मुख्यालयाखालीच मेट्रो रेल ३ चे काम

नियम मोडून बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्यास सुरुवातही झाली आहे.
दिव्याखालीच अंधार! नियमावली डावलून पालिका मुख्यालयाखालीच मेट्रो रेल ३ चे काम

मुंबई : वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली आहे; मात्र मुंबई महापालिका मुख्यालयाखालीच मेट्रो रेल ३ चे काम वेगाने सुरू असून, या ठिकाणी कुठलीही खबरदारी घेतली नसल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी खडी मिक्सरचे कामही उघड्यावरच सुरू आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार म्हणजे, ‘दिव्याखाली अंधार’ असे बोलले जात आहे.

मुंबईत मेट्रो रेल, कोस्टल रोड, रस्ते कामे अशी विविध प्रकारची सहा हजार कमे सुरु आहेत. मुंबईत प्रदूषण वाढीस बांधकाम ठिकाणाहून पसरणारे धुळीचे कण कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. फोर्ट येथील महापालिका मार्गावर मुंबई महापालिकेचे मुख्यालय आहे. मुख्यालयाच्या गेट क्रमांक ६ च्या समोरचं मेट्रो रेल ३ चे काम वेगाने सुरू आहे. या ठिकाणी भूमिगत काम बहुतांशी झाल्यामुळे आता महापालिका मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती सुरू आहे; मात्र ही दुरुस्ती करताना हा भाग केवळ बॅरिकेडस लावून बंद करण्यात आला आहे; मात्र धूळ रोखणारी यंत्रणा, पडदे लावण्यात आलेले नाहीत. तसेच रस्त्यासाठी लागणाऱ्या खडीच्या मिक्सरचे कामही उघड्यावर सुरू आहे. यानुसार नियम मोडून बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्यास सुरुवातही झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in