Dasara Melava: उद्या शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या तोफा धडाडणार! मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त

या दोन मेळाव्यांव्यतिरिक्त मंगळवारी देवी विसर्जन देखील आहे आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा वानखेडे स्टेडियमध्ये सामना रंगणार आहे
Dasara Melava: उद्या शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या तोफा धडाडणार! मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त

उद्या(24 ऑक्टोबर) होणाऱ्या दसरा मेळ्यावासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोस्त केला आहे. उद्या मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा होणारा मेळावा लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था निट राहील याची काळजी घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी 6 अपर आयुक्त, 16 पोलीस उपायुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2493 पोलीस अधिकारी आणि 12,449 पोलीस अंमलदार बंदोबस्तसाठी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरात शिवसेना शिंदे गटाचा आझाद मैदानावर आणि ठाकरे गटाचा शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ऐकेकाळी एकाच पक्ष असलेल्या आणि आता दोन गटात रुपांतर झालेल्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी दसरा मेळावा हा कोणत्या सणापेक्षा कमी नाही. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक हे दसरा मेळाव्याला शिवतिर्थावर येतात. आता उद्या या दोन्ही नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. हे दोन्ही मोठे मेळावे लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

या दोन मेळाव्यांव्यतिरिक्त मंगळवारी देवी विसर्जन देखील आहे आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा वानखेडे स्टेडियमध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान, या दरण्यान कायदा व सुवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सर्व बंदोबस्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in