एसटीच्या वेतनाची तारीख चुकली

तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी आधीच एसटी महामंडळाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.
एसटीच्या वेतनाची तारीख चुकली

मुंबई : एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या निवृत्तीनंतर एसटी महामंडळाचे नियोजन ढासळले आहे. संपकाळात उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने दर महिन्याच्या ७ ते १० या दरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अद्याप पाच दिवस होऊनही वेतन झाले नाही. सोमवारी (ता.११) कर्मचाऱ्यांचे वेतन होईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. मात्र, वेतन न झाल्यास महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या वतीने एसटी महामंडळ प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले आहे. एसटी महामंडळाला तातडीने नियमित व्यवस्थापकीय संचालक पद भरण्याची गरज आहे. तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी आधीच एसटी महामंडळाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in