Datta Dalvi: दत्ता दळवी यांना मोठा दिलासा! मुलूंड कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी दळवींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती.
Datta Dalvi: दत्ता दळवी यांना मोठा दिलासा! मुलूंड कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर

ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलूंड कोर्टाने दत्ता दाळवी यांनी जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी दळवींवर गुन्हा करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

मुलूंड कोर्टाने दत्ता दळवी यांना जामीन मंजूर केल्याने त्यांची ठाणे कारागृहातून मुक्तता होणार आहे. गेल्या २ दिवसांपासून दत्ता दळवी कारागृहात होते. कोणत्याही समाज आणि समूहाविरोधात अवमानकारक वक्तव्य न केल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.

41A ची नोटीस न देता दत्ता दळवी यांना अटक केल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता. त्यांच्या दाव्याची कोर्टानं नोंद घेतली आहे. पोलीसांनी सेक्शन १५३ गैरलागू केल्याचा दावा देखील दळवी यांच्या वकिलांनी केला होता. या स्टेजवर हे मान्य होऊ शकत नाही, असं निरिक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.

याच बरोबर दत्ता दळवी यांच्या वकिलांनी चंदा कोचर केसचा रेफरन्स कोर्टात दिला होता. कोर्टानं आरोपी दत्ता दळवी यांचं वय आणि मेडिकल हिस्ट्री लक्षात घेता जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्टानं काही अटी आणि शर्ती पाळणं बंधनकारक केलं आहे.

काय आहेत अटी शर्ती?

दत्ता दळवी यांना केस तापस संपण्यापर्यंत काही प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांविरोधात कोणतंही अवमानकारक वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचं प्रोक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई. तसंच पोलिसांना सहकार्य करणं बंधनकारक असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

कायदा आणि सूव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणं बंधनकारक राहणार आहगे. दळवी यांच्या जामीन अर्जास, मुंबई पोलिसांनी सक्त विरोध केला होता. दळवी यांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केल्याने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेतून शिवागाळी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी शिवसेना ठाकरे गटातर्फे भांडूपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहिस मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापूढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदूहृदयसम्राट' या उपमेवरुन माजी महापौर दत्ता दळवी यांनी जोरदार टीका केली होती. यावरुन शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

दत्ता दळवी यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं, असा आरोप करत शिंदे गटाने भांडूप पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in