भारतीय दलित साहित्य अकादमीच्या मुंबई शहर महासचिवपदी दत्ता खंदारे

दत्ता खंदारे यांच्या नवी मुंबई व ठाणे शहर विभागाच्या महासचिवपदी नियुक्तीमुळे दलित साहित्याचा प्रचार व प्रसार होण्यास अधिक संधी प्राप्त होणार आहे.
भारतीय दलित साहित्य अकादमीच्या मुंबई शहर महासचिवपदी दत्ता खंदारे

मुंबई : पूर्व मुंबईतील धारावी येथील ज्येष्ठ समाजसेवक दत्ता खंदारे यांची भारतीय दलित साहित्य अकादमीच्या मुंबई शहर महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय दलित साहित्य अकादमीच्या मुंबईतील कांदिवली (चारकोप) विभागीय कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दत्ता खंदारे दलित चळवळ तसेच पत्रकारितेच्या सेवाभावी क्षेत्रात अखंडित कार्यरत आहेत. दत्ता खंदारे यांच्या नवी मुंबई व ठाणे शहर विभागाच्या महासचिवपदी नियुक्तीमुळे दलित साहित्याचा प्रचार व प्रसार होण्यास अधिक संधी प्राप्त होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in