दारूच्या नशेत आईकडून मुलीला बेदम मारहाण

या घटनेनंतर तिने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
मुंबईत वृद्ध महिलेवर बलात्कार
मुंबईत वृद्ध महिलेवर बलात्कारप्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूने वापरली जाते

मुंबई : मालाड येथे आईकडून १४ वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निशा नावाच्या महिलेविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार मुलगी ही १४ वर्षांची असून ती मालाड येथील मालवणी परिसरात आई निशासोबत राहते. तिचे वडील कामानिमित्त हैदराबाद येथे राहत असून ते त्यांना दरमहा पैसे पाठवितात. निशा ही दारूच्या आहारी गेली असून दारूच्या नशेत ती नेहमी तिच्या मुलीला शिवीगाळ करून मारहाण करत असे. सोमवारी ८ जानेवारीला रात्री साडेअकरा वाजता ती नेहमीप्रमाणे घरात काम करत होती. यावेळी तिच्या आईने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुलीने तिला समजविण्याचा प्रयत्न केला असता तिने तिलाच बांबूने बेदम मारहाण केली होती. त्यात तिच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली होती.

लाथ्याबुक्यांनी मारहाण करताना आईने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती घाबरून घरातून पळून गेली. या घटनेनंतर तिने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी गंभीर दखल घेत आरोपी आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याच गुन्ह्यांत निशाची पोलिसांची चौकशी केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in