दाऊदच्या मालमत्तेचा २ कोटींत लिलाव

आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या संपत्तीचा लिलाव होत आहे. शुक्रवारी दाऊदच्या दोन जागांचा लिलाव झाला.
दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि रत्नागिरीतील संपत्तीचा जानेवारीत लिलाव
दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि रत्नागिरीतील संपत्तीचा जानेवारीत लिलाव

मुंबई : आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या संपत्तीचा लिलाव होत आहे. शुक्रवारी दाऊदच्या दोन जागांचा लिलाव झाला. या दोन्ही जागांची मूळ किंमत १५ हजार रुपये होती. या दोन्ही जागा २ कोटी रुपयांना विकल्या गेल्या.

ही जागा खरेदी करणाऱ्याने सांगितले की, पैशाच्या हिशोबाने ही जागा महाग आहे. पण, त्याचा सर्व्हे क्रमांक माझ्यासाठी खास आहे. ज्योतिष्यानुसार, तो क्रमांक शुभ आहे. मी त्या जमिनीवर सनातन स्कूल बनवणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबैक गावात चार शेत जमीन होत्या. त्याची राखीव किंमत १९.२२ लाख रुपये होती. त्या जमिनीला बोली लागली नाही.

१७० चौरस मीटर भूखंडाची राखीव किंमत १५४४० रुपये होती. तो भूखंड २.०१ कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला. हा भूखंड अजय श्रीवास्तव नावाच्या वकिलाने खरेदी केला आहे. यापूर्वीही त्याने दाऊदच्या तीन मालमत्ता खरेदी केल्या आहेत. यात दाऊदच्या लहानपणीच्या घराचाही समावेश आहे.

तुम्ही शेत जमिनीला जास्त दर दिला असे श्रीवास्तव यांना विचारले, तेव्हा ते म्हणाले की, मी एक सनातनी हिंदू आहे. मी माझ्या पंडिताचे म्हणणे ऐकतो. या प्लॉटचा क्रमांक माझ्यासाठी शुभ आहे. अजय श्रीवास्तव हे शिवसेनेचे माजी नेते आहेत. त्यांनी २०२० मध्ये दाऊदचा बंगला खरेदी केला होता. तेथे सनातन धर्म पाठशाला ट्रस्ट बनवली आहे. आता सनातन धर्म शाळा सुरू व्हायची आहे.

logo
marathi.freepressjournal.in