उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील गुन्ह्यांमध्ये दिवसागणिक वाढ

गर्दीचा फायदा घेत फलाट, पादचारी पूल आणि लोकल गाड्यांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले.
 उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील गुन्ह्यांमध्ये दिवसागणिक वाढ

मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत गुन्ह्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. खून, चोरी, दरोडे, विनयभंग इत्यादी गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जानेवारी २०२१ पासून जुलै २०२२ पर्यंत विविध प्रकारचे एकूण १४ हजार ३३४ गुन्हे घडले असल्याचे रेल्वे पोलीस प्रशासनाने सांगितले.

सद्यस्थितीत रेल्वेमध्ये कोरोनापूर्वीप्रमाणेच गर्दी होऊ लागली आहे. याच गर्दीचा फायदा घेत फलाट, पादचारी पूल आणि लोकल गाड्यांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले. चोरांनी प्रवाशांचे मोबाईल, पाकिट, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असलेल्या बॅगांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली. तर गर्दी नसलेल्या ठिकामी महिलांची छेडछाड, विनयंभगाबरोबरच चोरीच्या उद्देशाने मारहाणीच्याही घटना घडू लागल्या आहेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गांवर २०२१ आणि २०२२ मध्ये एकूण १४ हजार ३३४ गुन्हे घडले आहेत. माहिती देण्यात आली. २०२१ आणि २०२२ मध्ये रेल्वेवरच सर्वाधिक गुन्हे घडले असून त्यांची एकूण संख्या नऊ हजार २२२ इतकी आहे. तर पश्चिम रेल्वे उपनगरीय हद्दीत पाच हजार ११२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दरम्यान, विविध गुन्ह्यात अटक केलेले आणि त्यानंतर शिक्षा भोगूनही वारंवार गुन्हे करणाऱ्या १३६ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. चोरी, तसेच लोकल प्रवासात फटका मारुन चोरी करणे, अशा गुन्ह्यांत अटक केलेल्या आणि शिक्षा भोगून झालेल्यानंतरही वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींना तडीपार करण्यात येत असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in