तारदेवमध्ये भरदिवसा घरावर दरोडा ; तोंडाला सेलोटेप लावल्याने वृद्धेचा मृत्यू

या दरोडेखोरांनी दोन्ही वृद्धांच्या तोंडावर सेलोटेप लावल्याने यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
तारदेवमध्ये भरदिवसा घरावर दरोडा ; तोंडाला सेलोटेप लावल्याने वृद्धेचा मृत्यू

मुंबईच्या तारदेव येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तीन अज्ञातांनी एका वृद्ध दांपत्याच्या घरात घुसुन त्यांचे हात पाय बांधून घरातून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. यावेळी या दरोडेखोरांनी दोन्ही वृद्धांच्या तोंडावर सेलोटेप लावल्याने यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन अग्रवाल वय ७५ हे सकाळी साडेसहा वाजेच्या सु्मारास मॉर्निंग वॉकसाठी घरातून निघाले होते. यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांनी ढकलून दिलं. यावेळी मोहन अग्रवाल यांच्या पत्नी सुरेखा वय वर्ष ७० ह्या देखील घरात होत्या. या तिन्ही दरोडेखोरांनी या दाम्पत्यांच्या तोंडावर सेलोटेप लावून त्यांचे हात पाय दोरीने बांधले.

दोन्ही वृद्धांना बांधुन ठेवल्यानंतर यांनी घरातील दागिन्यांवर डल्ला मारला आणि तेथून पोबारा केला. यानंतर मोहन अग्रवाल यांनी कसबस स्वत:ला सोडवून शेजाऱ्यांना बोलावलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पती पत्नीला नायर रुग्णालयात नेलं. यावेळी डॉक्टरांनी पत्नी सुरेखा यांना मृत घोषित केलं. या प्रकरणाचा तारदेव पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. भर दिवसा अशी धक्कादायक घटना घडल्याने तारदेव परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in