बोरिवलीतील भूखंड विक्रीची DCP स्तरावर चौकशी; मंत्री उदय सामंत यांची माहिती

बोरिवली येथील साईबाबानगरातील भूखंड विक्री प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस उपनिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यामार्फत करण्यात येत आहे. आता ही चौकशी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्याबाबत पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
उदय सामंत
उदय सामंतसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : बोरिवली येथील साईबाबानगरातील भूखंड विक्री प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस उपनिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यामार्फत करण्यात येत आहे. आता ही चौकशी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्याबाबत पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

बोरिवलीमधील साईबाबानगर लेआउटमध्ये १८ इमारती उभारण्यात आल्या. विकास आराखडा २०३४ नुसार येथील भूखंड शिक्षण संस्था, पालिका शाळा, दवाखाना, मैदान तसेच इतर समाजोपयोगी कारणांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, हे भूखंड पालिकेने स्वतःच्या नावावर करण्याबाबत दिरंगाई केली असून हे भूखंड विकासकाला विकण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याबाबत आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रश्नाला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, या प्रकरणात एका महिला अधिकाऱ्याचे नाव आल्याचे नमूद केले. त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास कोणतीही अडचण नाही. पदोन्नती होऊन महापालिका उपायुक्त झाल्यानंतरही त्या जुन्या जागेवर कार्यरत आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच साईबाबानगर येथील ज्या पुनर्विकास प्रकल्पांना स्थगिती आहे.

logo
marathi.freepressjournal.in