
मुंबई : बेवारस सापडलेल्या रमेश समीर खडका (वय ५७ वर्षे)नावाच्या व्यक्तीच्या अपमृत्यूची नोंद कफ परेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हा कुलाबा पोस्ट ऑफिसजवळ मिस्टर चाव हॉटेल मध्ये काम करत होता. मयत रमेश २१ सप्टेंबर रोजी सेंट जोर्जेस रुग्णालयात उपचारासाठी स्वतःहुन दाखल झाला होता. त्याला न्यूमोनियाचा त्रास होत होता. मयत इसम सेंट जॉर्जेस रुग्णालय येथे उपचार घेत होता. उपचार घेत असताना १२ ऑगस्ट रोजी रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले. त्यांच्या अपमृत्यूची कफ परेड पोलीस ठाण्यात येथे नोंद करण्यात आली आहे.