ठाणे-कसारा रेल्वेमार्ग बनलाय मृत्यूचा सापळा; १५ महिन्यांत ६६३ प्रवाशांचा मृत्यू

गेल्या काही वर्षांपासून ठाणे, कसारा, बदलापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावर ताण निर्माण झाला असून लोकल गर्दीने ओसंडून धावत आहेत. लोकलमध्ये पाय ठेण्यास जागा नसल्याने अनेकांचा प्रवासादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू होत असून ठाणे ते बदलापूर आणि कसारा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
ठाणे-कसारा रेल्वेमार्ग बनलाय मृत्यूचा सापळा; १५ महिन्यांत ६६३ प्रवाशांचा मृत्यू
Published on

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ठाणे, कसारा, बदलापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावर ताण निर्माण झाला असून लोकल गर्दीने ओसंडून धावत आहेत. लोकलमध्ये पाय ठेण्यास जागा नसल्याने अनेकांचा प्रवासादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू होत असून ठाणे ते बदलापूर आणि कसारा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या १५ महिन्यात या मार्गावर लोकलच्या विविध अपघातांमध्ये ६६३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे-कसारा व बदलापूर भागात राहणाऱ्या प्रवाशांचा रेल्वे प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा बनला आहे. दररोज हजारो प्रवासी लोकलच्या दरवाज्यांना, रिकाम्या जागांमध्ये लटकून प्रवास करतात. यामुळे दररोज लोकलमधून पडून प्रवाशांचे अपघात होत आहेत. १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत रेल्वे रूळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून ६६३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

अपघातांमधील ६६३ जणांपैकी ३९१ प्रवाशांचा मृत्यू रूळ ओलांडताना तर २७२ प्रवाशांचा मृत्यू धावत्या लोकलमधून पडल्यामुळे झाला आहे. अपघातांमध्ये पुरुष प्रवाशांचे प्रमाण अधिक असून, केवळ २०२४ या वर्षात ठाणे हद्दीत १४० पुरुषांचा मृत्यू झाला. डोंबिवलीत ५१ पुरुष तर कल्याणमध्ये तब्बल ९१ पुरूष अपघातात मृत्यूमुखी पडले. महिलांच्या मृत्यूची संख्या तुलनेने कमी असून ठाण्यात ११, डोंबिवलीत ३ आणि कल्याणमध्ये ३ महिलांचा मृत्यू झाला.

अपघात कुठे किती?

logo
marathi.freepressjournal.in