गोवंडी मानखुर्द परिसरात रस्त्यावर डेब्रिज; बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करा

शिवाजी नगर, देवनार, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे व चेंबूर परीसरात डेब्रिज वाहून नेणारे डंपर अनधिकृतपणे रात्री अपरात्री मुख्य रस्ता व मुख्य रस्त्यांशेजारील भागात टाकतात
गोवंडी मानखुर्द परिसरात रस्त्यावर डेब्रिज; बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करा
PM

मुंबई : शिवाजी नगर, देवनार, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे व चेंबूर परीसरात डेब्रिज वाहून नेणारे डंपर अनधिकृतपणे रात्री अपरात्री मुख्य रस्ता व मुख्य रस्त्यांशेजारील भागात टाकतात. त्यामुळे परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि परीसर अस्वच्छ होतो. रस्त्यांवर टाकण्यात येणारे डेब्रिज पालिकेला उचलावे लागते आणि पालिकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. प्रदूषण मुक्त मुंबईसाठी रस्त्यावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभागाने वाहतूक पोलिसांना पत्र दिल्याचे एम पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी सांगितले. दरम्यान, या परिसरात बेकायदा वाहन पार्किंगवर कारवाई करावी, असेही पत्रात नमूद केले आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी चेंबूर परिसरात सरप्राइज व्हिजीट दिली असता त्याठिकाणी अस्वच्छता निदर्शनास आल्याने संबंधित कंत्राटदाराला दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली असून, प्रदूषणात वाढ होत आहे. मुंबई प्रदूषण मुक्त करण्यासाठी बांधकाम ठिकाणी ३५ फूट उंच भिंत बांधणे स्प्रिकलर बसवणे धुळीचे कण पसरु नये यासाठी पडदे लावणे, पाण्याची फवारणी करणे, रस्त्यावर अनधिकृतपणे डेब्रिज कचरा टाकू नये अशी २७ प्रकारची नियमावली २३ ऑक्टोबर रोजी जारी केली. तसेच डेब्रिज वाहून नेणारे डंपर बंदीस्त असावेत असे ही स्पष्ट करण्यात आले. मात्र रस्त्यावरच अनधिकृतपणे रात्री अपरात्री डेब्रिज टाकण्यात येत असल्याने परिसरात अस्वच्छता पसरते आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे चेंबूर गोवंडी मानखुर्द शिवाजीनगर परिसरात अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे वाहतूक पोलिसांना केल्याचे ससाणे यांनी नमूद केले आहे.

'या' ठिकाणी अनधिकृतपणे डेब्रिज टाकतात!

इंडीयन ऑईल नगर, जी.एम. लिंक रोड मोठया नाल्याशेजारी, मानखुर्द सव्हिॅस रोड, सायन पनवेल महामार्ग, आगर वाडी सिग्नल सायन पनवेल महामार्ग, एसएमएस बायोमेडिकल वेस्ट डिसपोजल कंपनी  मानखुर्द अग्निशमन केंद्र समोर, जी.एम. लिंक रोड,

'या' ठिकाणी बेकायदा पार्किग!

-शिवाजी नगर, देवनार, गोवंडी, मानखुर्द, ट्राॅम्बे या  परीसरात बेकायदा वाहनांची पार्किंग असते. यामुळे या ठिकाणी स्वच्छता करण्यात अडचण निर्माण होते.

-एम पूर्व विभाग मुंबईचा एंट्री पाॅईटवरच असल्याने व्हीहीआयपी व्हीआयपी लोकांची सतत ये जा सुरु असते. त्यामुळे या परिसरात बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in