Mumbai : ‘डेक्कन क्वीन’चा आज महोत्सव; ऐतिहासिक गाडीचे नूतनीकरण

गौरवशाली डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा ‘रेल्वे महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २७ मार्च रोजी हा महोत्सव साजरा होणार आहे.
Mumbai : ‘डेक्कन क्वीन’चा आज महोत्सव; ऐतिहासिक गाडीचे नूतनीकरण
Mumbai : ‘डेक्कन क्वीन’चा आज महोत्सव; ऐतिहासिक गाडीचे नूतनीकरण
Published on

मुंबई : गौरवशाली डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा ‘रेल्वे महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २७ मार्च रोजी हा महोत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी तसेच तिचे ऐतिहासिक आकर्षण जपण्यासाठी डेक्कन क्वीनचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

मुंबई आणि पुणे शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन १ जून १९३० रोजी सुरू झाली. ही भारतातील पहिली डिलक्स ट्रेन आहे. भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन, पहिली लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक इंजिन असलेली प्रवासी ट्रेन आणि व्हॅस्टिब्युल असलेल्या पहिल्या काही रेल्वेंपैकी हि एक गाडी आहे. ही गाडी ‘फक्त महिलांसाठी’ डबा आणि ‘डायनिंग कार’ असलेली पहिली गाडी होती. अनेक दशकांमध्ये, व्हॅक्यूम ब्रेक स्टॉकपासून ते आधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित एलएचबी डब्यांपर्यंत तिचा विकास झाला आहे.

‘डेक्कन क्वीन’चा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गाडी सुटण्याच्या एक तास आधी, म्हणजेच सायंकाळी ५ वाजून १० वाजता सुरू होईल. गाडीच्या भव्यतेचे प्रतीक म्हणून, तिला फुलांनी सुशोभित करण्यात येणार आहे. १९३० सालापासून चालणारी भारतातील पहिली सुपरफास्ट आणि विजेवर चालणारी गाडी असलेल्या ‘डेक्कन क्वीन’चा समृद्ध इतिहास दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे उलगडून दाखवला जाणार आहे.

‘रेल्वे महोत्सवा’चा भाग म्हणून प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि तिचे ऐतिहासिक आकर्षण जपण्यासाठी डेक्कन क्वीनचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवासादरम्यान उत्कृष्ट भोजनाचा अनुभव देण्यासाठी डायनिंग कारचे ऐतिहासिक सौंदर्यशास्त्रानुसार नूतनीकरण करण्यात आले आहे, तसेच फर्निचर, छत आणि फरशीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच स्वच्छता सुधारण्यासाठी स्वच्छतागृहांमध्ये विनाइल, ड्युरो वाइप मॅट्स, साबण आणि टिश्यू डिस्पेंसर बसवण्यात आले आहेत. एसी कोचच्या आसनांना सीट कव्हर्स लावून अद्ययावत केले आहे; दरवाजाच्या भागात विनाइलची सोय केली आहे. तर छत आणि पॅनल बोर्ड आकर्षक थीमसह पुन्हा डिझाइन केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in