डेक्कन क्वीन नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज

वजनाने हलके आणि अपघातरहित एलएचबी डबे प्रवाशांच्या पसंतीस उतरत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले
डेक्कन क्वीन नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज

डेक्कन क्वीन बुधवार २२ जूनपासून नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली. सायंकाळी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी मुंबई ते पुणे दरम्यान धावणारी वेगवान अशी डेक्कन क्वीन सीएसएमटी येथून पुण्यासाठी रवाना झाली. या नव्या अत्याधुनिक बदल आणि बदललेले रंगसंगती प्रवाशांना आकर्षित करत असून वजनाने हलके आणि अपघातरहित एलएचबी डबे प्रवाशांच्या पसंतीस उतरत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

मुंबई ते पुणे दरम्यान प्रतिदिन लाखो चाकरमानी ये-जा करतात. या चाकरमान्यांची डेक्कन क्वीनला सर्वाधिक पसंती असते. १ जुन १९३० रोजी धावणारी डेक्कन क्वीन सुरुवातीला कल्याण ते पुणे इथपर्यंत धावत होती. त्यानंतर सीएसएमटीपर्यंत त्या गाडीच्या मार्गाचा विस्तार केला. या ट्रेनमध्ये महिलांसाठी राखीव डबे, पासधारकांसाठी डबे, जनरल डबे, वातानुकूलित डब्यांबरोबरच डायनिंग कारही आहे. अशा डेक्कन क्वीनला नव्या रुपात आणण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून डेक्कन क्वीनला वेगळी रंगसंगती देण्यात आली आहे. या डब्यात एकाच वेळी ४० प्रवासी बसून खानपान सेवेचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. दरम्यान, बुधवारी ही गाडी पहिल्यांदाच नव्या रूपात मार्गस्थ होत असताना प्रवाशांकडून उत्साही वातावरण तसेच आनंद व्यक्त करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in