बोलण्यात गुंतवून एटीएममध्ये येणाऱ्या खातेदारांची फसवणूक

बोलण्यात गुंतवून एटीएममध्ये येणाऱ्या खातेदारांची फसवणूक

सीसीटीव्ही फूटेजवरुन पोलिसांनी प्रदुम यादव आणि विवेक पांडे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते

मुंबई : बोलण्यात गुंतवून एटीएममध्ये येणाऱ्या खातेदारांची फसवणूक करून पळून जाणाऱ्या एका दुकलीस कुरार पोलिसांनी अटक केली. प्रदुम राधेशाम यादव ऊर्फ पप्पी आणि विवेक मुदुल पांडे ऊर्फ विक्की अशी या दोघांची नावे आहेत. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात अशाच १६हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. मालाड परिसरातील एटीएम सेंटरमध्ये गेलेल्या काही लोकांना बोलण्यात गुंतवून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डेबिट कार्डसह पासवर्ड प्राप्त करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक केल्याच्या काही तक्रारी कुरार पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. सीसीटीव्ही फूटेजवरुन पोलिसांनी प्रदुम यादव आणि विवेक पांडे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत त्यांच्याच अलीकडेच झालेल्या दोन गुन्ह्यांत सहभाग असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. तपासात त्यांनी अशाच १६ गुन्ह्यांची कबुली दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in