बोगस वेबसाईटच्या माध्यमातून हॉटेलसह ग्राहकांची फसवणूक

बोगस वेबसाईटच्या माध्यमातून हॉटेलसह ग्राहकांची फसवणूक

ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगून ही रक्कम विविध दोन बँक खात्यात जमा केली जात होती.

मुंबई : बोगस वेबसाईटच्या माध्यमातून बुकिंग घेऊन ग्राहकांसह हॉटेलची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस अंधेरी पोलिसांनी अटक केली. आकाश शामलाल यादव असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अंधेरीतील एका हॉटेलची बोगस वेबसाईट बनवून त्याद्वारे ग्राहकांकडून बुकिंग घेतली जात होती. मात्र बुकिंगची ही रक्कम हॉटेलच्या बँक खात्यात जमा न करता दुसऱ्या बँक खात्यात जमा होत होते. याबाबत काही तक्रारी ग्राहकांकडून प्राप्त होताच हॉटेल प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती.

या चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या हॉटेलसारखी आणखीन एक हुबेहूब दिसणारी वेबसाईट निदर्शनास आली होती. अज्ञात व्यक्तीने हॉटेलची ही वेबसाईट बनवून अनेक ग्राहकांचे बुकींग घेतल्याचे दिसून आले. ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगून ही रक्कम विविध दोन बँक खात्यात जमा केली जात होती. हा प्रकार उघडकीस येताच हॉटेलच्या वतीने अंधेरी पोलिसात तक्रार करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in