दीनदयाल बंदर कार्गो हाताळणी टर्मिनल्स विकसित करण्यासाठी सज्ज

टुना-टेकरा येथे कंटेनर टर्मिनल आणि बहुउद्देशीय कार्गो बर्थ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दीनदयाल बंदर कार्गो हाताळणी टर्मिनल्स विकसित करण्यासाठी सज्ज

दीनदयाल बंदर प्राधिकरण पश्चिम भारतातील गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात स्थित भारतातील पहिल्या क्रमांकाचे प्रमुख बंदर, देशाचे पहिल्या क्रमांकाचे कार्गो हाताळणी बंदर म्हणून दर्जा वाढवण्यासाठी, पीपीपी मोड अंतर्गत बीओटी आधारावर अंदाजे रु. ५,९६३ कोटीच्या गुंतवणुकीने दोन मेगा कार्गो हाताळणी टर्मिनल्स विकसित करण्यासाठी सज्ज आहे.

प्रदेशातील भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आणि गुजरात आणि संलग्न राज्यांच्या आसपासच्या डाउनस्ट्रीम उद्योगांना अधिक लाभ देण्यासाठी प्राधिकरणाने कच्छ जिल्ह्यातील टुना-टेकरा येथे कंटेनर टर्मिनल आणि बहुउद्देशीय कार्गो बर्थ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

एस. के. मेहता, आयएफएस, अध्यक्ष, दीनदयाल बंदर प्राधिकरण, परिषदेला संबोधित करताना म्हणाले, कंटेनर टर्मिनल अनुक्रमे १४ मीटर ते १८ मीटर द्राफ्ट सह ६००० टीइयू ते २१००० टीइयू पर्यंतच्या पुढील पिढीतील जहाजे/खोल द्राफ्ट जहाजे हाताळण्याची योजना आखत आहे. टर्मिनलची अंदाजे किंमत आणि हाताळणी क्षमता अनुक्रमे रु. ४२४३.६४ कोटी आणि २.१९ दशलक्ष टीइयू आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in