डोंगरीत सखोल स्वच्छता अभियान; राडारोडा, रंगरंगोटी, फांद्यांची छाटणी

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार, स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी पालिकेकडून प्रत्‍येक प्रशासकीय विभागात सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येत आहे.
डोंगरीत सखोल स्वच्छता अभियान; राडारोडा, रंगरंगोटी, फांद्यांची छाटणी

मुंबई : संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत पालिकेच्या 'बी' विभागातील डॉ. मैशेरी मार्ग, डोंगरी मंडई, सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील अंतर्गत छोटे रस्ते, चौक, गल्लीबोळ, घरगल्ल्या, गटारे यांची स्वच्छता तसेच झाडांची छाटणी, धूम्र फवारणी, रस्ते विभाजक आणि कडेचे दगड रंगरगोटी, राडारोडा उचलणे आदी कामे करण्यात आली.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार, स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी पालिकेकडून प्रत्‍येक प्रशासकीय विभागात सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार, आता दर शनिवारी सर्वच २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, बी विभागाचे सहायक आयुक्त उद्धव चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागात स्वच्छता मोहीम राबवली गेली. वरिष्‍ठ पोलिस नि‍रीक्षक सदानंद माने, व्यवस्थापक (सँडहर्स्‍ट रोड रेल्‍वे स्थानक) शेवाळे, रूपेश पाटील, लोकप्रतिनिधी आणि बी विभागातील सर्व खातेप्रमुख, इतर अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्यासह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

डॉ. मैशेरी मार्ग, डोंगरी मंडई, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग या तीन भागातील अंतर्गत रस्‍ते, छोट्या गल्ल्या, चौक, गटारे यांची स्वच्छता करून कचरा, माती, राडारोडा, लाकडे, अडगळीच्या वस्तू, कपारींमध्ये उगवलेली झुडपी काढून योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत घरगल्ल्यांमध्ये जाऊन कचरा, राडारोडा, टाकाऊ साहित्य काढून स्वच्छता करण्यात आली. त्याच बरोबर गटारे स्वच्छ करून, रस्ते ब्रशिंग करून पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छ धुवून काढण्यात आले.

कायम स्वच्छता राखा!

सहाय्यक आयुक्त उद्धव चंदनशिवे, उपस्थित लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकाराने स्वच्छता केली. तसेच स्वच्छता कायम राखण्यासंदर्भात स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in