एक हजार आसन क्षमतेचे दामोदर नाट्यगृह; नाट्यगृह, शाळेचे बांधकाम एकाचवेळी सुरू करण्याचे दीपक केसरकर यांचे निर्देश

मराठी संस्कृती आणि नाट्य संस्कृतीची परंपरा जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून दामोदर नाट्यगृहाच्या माध्यमातून झाले आहे.
एक हजार आसन क्षमतेचे दामोदर नाट्यगृह; नाट्यगृह, शाळेचे बांधकाम एकाचवेळी सुरू करण्याचे दीपक केसरकर यांचे निर्देश

मुंबई : परळ येथील दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणी प्रकल्प अंतर्गत १ हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारण्यात येईल, असे आश्वासन मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ - दक्षिण विभागातील दामोदर नाट्यगृह आणि सोशल सर्व्हीस लीगच्या शाळेला केसरकर यांनी गुरुवारी भेट दिली. दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणी प्रकल्पांतर्गत सुधारीत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी राज्य शासनाच्या संबंधित विभागांना दिल्या. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, उपआयुक्त रमाकांत बिरादार, शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ आदी उपस्थित होते.

मराठी संस्कृती आणि नाट्य संस्कृतीची परंपरा जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून दामोदर नाट्यगृहाच्या माध्यमातून झाले आहे. तसेच सोशल सर्व्हीस लिगच्या माध्यमातूनही चांगले काम झाले आहे. म्हणूनच दामोदर नाट्यगृह हे पुन्हा एकदा दिमाखात उभारायला हवे. पुनर्बांधणीत ८०० आसन क्षमतेचे सभागृह प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु, याठिकाणी १ हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारण्यात यावे, अशी सूचना केसरकर यांनी केली. तसेच सुधारित आराखडा सादर करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सुधारित प्रस्तावाला बृहन्मुंबई महानगरपालिकेची यथोचित मान्यता मिळाल्यानंतर दामोदर नाट्यगृह आणि शाळा अशा दोन्ही वास्तुंच्या उभारण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही दोन्ही बांधकामे एकाचवेळी सुरू करण्यात यावी, अशीही सूचना केसरकर यांनी संबंधित विभागांना केली. तसेच सहकारी मनोरंजन मंडळालाही केसरकर यांनी या दौऱ्यात भेट दिली. या संस्थेलाही १ हजार चौरस फुटाची जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केसरकर यांनी दिल्या.

सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश

नाट्गृहाच्या पुनर्बांधणीत ८०० आसन क्षमतेचे सभागृह प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु, याठिकाणी १ हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारले जाणार आहे. त्यामुळे आता सुधारित आराखडा सादर करण्यात यावा, असे निर्देश केसरकर यांनी यावेळी दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in