अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीला विलंब; आचारसंहितेची सबब नको, अंतिम अधिसूचना जारी करा: हायकोर्ट

अग्निसुरक्षा नियमांची मे अखेर अंमलबजावणी सुरू करा, आचार संहितेचे कारण पुढे करून आता वेळाढूपणा करून नका, अशी सक्त ताकीद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली.
अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीला विलंब; आचारसंहितेची सबब नको, अंतिम अधिसूचना जारी करा: हायकोर्ट

मुंबई : अग्निसुरक्षा नियमांची मे अखेर अंमलबजावणी सुरू करा, आचार संहितेचे कारण पुढे करून आता वेळाढूपणा करून नका, अशी सक्त ताकीद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्याखंडपीठाने या पूर्वी दिलेल्या टाइमलाईनचे पालन करा. २० मे २०२४ पूर्वी अंतिम अधिसूचना जारी करून पुढील सुनावणीपूर्वी अधिसूचनेच्या कार्यवाहीचा प्रगत अहवाल सादर करा, असे आदेशही दिले. दरम्यान, महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करू, आगीशी दोन हात करायला अग्निशमन यंत्रणा सक्षम मुंबई अग्निशमन दलाची ग्वाही दिली.

मुंबईवरील २६ नोव्हेंबर ११ रोजी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील इमारतींच्या अग्नी सुरक्षेविषयी, तसेच अशा घटना घडल्यास जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी २००९ मध्ये प्रारूप अधिसूचना काढली होती; मात्र त्याबाबतची अंतिम अधिसूचना काढण्यात आलेली नाही. ती काढण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी ॲड. आभा सिंह यांच्या वतीने ॲड. आदित्य प्रताप यांनी जनहित याचिका केली आहे.

आगीशी मुकाबला करण्यात अग्निशमन यंत्रणा सक्षम

दरम्यान, मुंबई महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करून आगीशी मुकाबला करण्यात अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याची ग्वाहीच न्यायालयात दिली. मुंबईत एकूण ३५ फायर स्टेशन्स आणि १९ मिनी फायर स्टेशन्स आहेत. या व्यतिरिक्त आणखी फायर स्टेशन्स सुरू करण्याचे काम प्रगतिपथावर असून, ती पुढील दोन ते तीन वर्षांत ती कार्यान्वित होतील. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदतकार्य सुरू करण्यासाठी मिनी फायर स्टेशन्स कार्यान्वित केली असून, मुंबई अग्निशमन दलामध्ये मुख्य अग्निशमन अधिकाऱ्‍यापासून फायरमनपर्यंत एकूण २५८९ मनुष्यबळ आणि विविध प्रकारची २८३ आपत्कालीन मदत वाहने आहेत. त्यात फायर इंजिन्ससह फायर रोबोट, फायर बाइक्स आदी वाहनांचा समावेश असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in