आपत्तकालीन परिस्थितीत गरीब रुग्णांना मदत मिळण्याची मागणी

रईस शेख यांनी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्र लिहले
आपत्तकालीन परिस्थितीत गरीब रुग्णांना मदत मिळण्याची मागणी
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने महापौर मदत निधीमधून गरीब रुग्णांना देण्यात येणारी तातडीची वैद्यकीय मदत सध्या महापौर नसल्यामुळे प्रशासकांच्या माध्यमातून देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार आणि मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक रईस शेख यांनी केली आहे. रईस शेख यांनी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्र लिहून याबाबत हस्तक्षेप करत महापालिका आयुक्तांना सूचना करण्याची मागणी केली आहे. ही मदत मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे उपचार खोळंबले असून अनेकांचे हाल सुरू आहेत. सध्या मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासकराज सुरू असल्याने ही मदत मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. गरजू गरिबांना वैद्यकीय मदत तातडीने वितरित करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी रईस शेख यांनी पत्राद्वारे केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in