मुंबईतील घरांच्या मागणीत झाली वाढ,मॅजिकब्रिक्स प्रोपइंडेक्सचा अहवाल जाहीर

दुसऱ्या तिमाहीत एकूण मागणीच्या ५० टक्के आणि एकूण पुरवठ्याच्या ४७ टक्के २ बीएचके च्या मागणीसह समान प्रवाह दर्शविला
मुंबईतील घरांच्या मागणीत झाली वाढ,मॅजिकब्रिक्स प्रोपइंडेक्सचा अहवाल जाहीर

मुंबईतील निवासी मागणीत (शोध) तिमाही ते तिमाही १६.५ टक्क्यांची वाढ दिसून आली तर पुरवठा (सूचीत) तिमाही ते तिमाही ४.५ टक्क्यांची वाढ दिसल्याचे मॅजिकब्रिक्स प्रोपइंडेक्स अहवाल दुसरी तिमाही, २०२२ मधून उघड झाले आहे.

अहवालात पुढे आढळून आले की, मुंबईत २ बीएचके अपार्टमेंटने गृहखरेदीदारांच्या पसंतींवर वर्चस्व गाजवले आणि या कालावधीत ४३ टक्क्यांची मागणी आणि ४४ टक्क्यांचा पुरवठ्याचा वाटा होता. यावरून परवडणाऱ्या युनिट्ससाठी असलेले त्यांचे प्राधान्य दिसून येते.

नवी मुंबईने २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत एकूण मागणीच्या ५० टक्के आणि एकूण पुरवठ्याच्या ४७ टक्के २ बीएचके च्या मागणीसह समान प्रवाह दर्शविला. ठाण्यात १ आणि २ बीएचके युनिट्स असलेल्या छोट्या कॉन्फिगरेशन घरांनी एकूण मागणीच्या ७९ टक्के आणि एकूण पुरवठ्याच्या ८१ टक्के आणि ४५ टक्के मागणीचा वाटा असलेल्या २ बीएचके नी निवासी बाजारपेठेत वर्चस्व कायम ठेवले.

मॅजिकब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै म्हणाले, भारतभर निवासी मागणीत झालेली वाढ ही आर्थिक सुधारणा आणि उत्पन्न स्थैर्य यांचे प्रतिबिंब आहे. कार्यालये आणि शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू झाल्यामुळे महानगरांमध्ये परतणाऱ्या कुटुंबांमुळेही याला चालना मिळत आहे. वाढत्या महागाईत जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि सामग्रीच्या इनपुट खर्चात झालेली वाढ आणि तारण दर यामुळे किमती वाढत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in