विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नावाने पैशांची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने एका टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कार्यालयात जाऊन पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नावाने पैशांची मागणी
PM

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने एका टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कार्यालयात जाऊन पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

शिवांश आशिष सिंह हे गेल्या सहा महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात. गुरुवारी ते राहुल नार्वेकर यांच्यासोबत त्यांच्या कफ परेड येथील खासगी कार्यालयात होते. यावेळी तिथे नंदिता बेदी या आल्या होत्या. त्यांना रााहुल नार्वेकर यांची भेट घ्यायची होती, त्यामुळे त्या आधी विधानभवन येथील शासकीय कार्यालयात गेल्या होत्या; मात्र विधानभवन बंद असल्याने त्या तिथे आल्या होत्या. तिचा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. सोमवारी ५ जानेवारीला आफ्रिका या देशात आमदाराच्या टुर्ससंदर्भात चर्चा करण्यासाठी त्या कार्यालयात आल्या. काही वेळानंतर त्यांना त्यांचा कर्मचारी श्रेयस यांचा फोन आला होता. राहुल नार्वेकर यांच्याकडून दोन व्यक्ती आले असून, ते पैशांची मागणी करत आहेत. श्रेयससोबत त्यांनी एका व्यक्तीशी मोबाईलवरून संभाषण करून दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in