कोरोनाच्या स्वयंचाचणी संचाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ

कोरोनाबाधितांची संख्या ही नोंदवल्या जाणाऱ्या दैनंदिन आकडेवारीपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
कोरोनाच्या स्वयंचाचणी संचाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली असून, घरीच करण्यात येणाऱ्या कोरोनाच्या स्वयंचाचणी संचाच्या (सेल्फ टेस्ट किट) मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, संचांची मागणीही वाढली असली तरी शहरात प्रत्यक्षात किती संचांची विक्री होत आहे, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही नोंदवल्या जाणाऱ्या दैनंदिन आकडेवारीपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या दोन आठवड्यांत जवळपास प्रत्येक दिवशी मुंबईत हजाराच्या आसपास कोरोनारुग्ण आढळत आहेत. त्यामुळे घरच्या घरी करता येणाऱ्या रॅपिड अँटिजेन चाचण्यांच्या वापराकडे जनतेचा कल वाढला असून, या चाचण्यांद्वारे अवघ्या २० मिनिटांत निदान होत आहे. त्यामुळे गृहविलगीकरणासह अन्य निर्बंधापासून नागरिकांना सुटका मिळत आहे. मे महिन्यात स्वयंचाचणी संचाची विक्री शून्य होती; मात्र आता दिवसाला ३० ते ३५ संच विकले जात असल्याचे समजते. प्रामुख्याने अन्य शहरातून प्रवास करून आलेले, अथवा प्रवासानिमित्ताने बाहेर जाणारे याचा अधिक वापर करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in