मुंबई : फेसबुक हॅक करून एका पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने त्यांच्या परिचित लोकांकडून फर्निचर विक्रीच्या नावाने पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रेल्वेच्या वांद्रे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव बाबूराव महाजन यांच्या तक्रारीवरून अंधेरी रेल्वे पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा अंधेरी रेल्वेसह सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरू आहे. बाजीराव महाजन हे वांद्रे विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असून, सोमवारी त्यांचे फेसबूक अकाऊंट अज्ञात सायबर ठगांनी हॅक करून या अकाऊंटमधून त्यांच्या परिचित लोकांकडे पैशांची मागणी केली होती