अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत खंडणीची मागणी

२७ वर्षांचा तक्रारदार व्यवसायाने वकिल आहे. त्याचे कुटुंबीय बिहारच्या पटना शहरात राहत असून, तो विलेपार्ले येथील एका हॉस्टेलमध्ये राहतो.
अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत खंडणीची मागणी

मुंबई : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका वकिलाकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या वकिलाच्या तक्रारीवरून रिया गोयल नाव सांगणाऱ्या महिलेविरुद्ध जुहू पोलिसांनी भादंविसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. २७ वर्षांचा तक्रारदार व्यवसायाने वकिल आहे. त्याचे कुटुंबीय बिहारच्या पटना शहरात राहत असून, तो विलेपार्ले येथील एका हॉस्टेलमध्ये राहतो. गुरुवारी रात्री तो त्याच्या हॉस्टेलवर होता. यावेळी त्याला रिया गोयल या फेसबुक अकाऊंटवरून एक मॅसेज आला होता. त्यात तिने त्याला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले होते; मात्र त्याने तिला कॉल केला नाही. त्यानंतर तिनेच त्याला कॉल केला. दोन मिनिटांच्या या कॉलमध्ये या दोघांनी एकमेकांशी संभाषण केले नाही; मात्र तिने अश्लील चाळे करून त्याचे रेकॉर्डिंग केले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in