प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 'म्हाडा'मध्ये लोकशाही दिन

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात (म्हाडा) नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 'म्हाडा लोकशाही दिन' आयोजित करण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 'म्हाडा'मध्ये लोकशाही दिन

मुंबई : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन शासन स्तरावर राबविण्यात येत असतो. त्याच धर्तीवर 'म्हाडा'मध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा दिन आयोजित करण्यात येणार असून, या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस म्हाडा लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात (म्हाडा) नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 'म्हाडा लोकशाही दिन' आयोजित करण्यात येणार आहे.

 म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी ११ वाजता  म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार असून 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

अहवाल सादर करणार

म्हाडा लोकशाही दिन झाल्यानंतर त्याच आठवड्यात बैठकीत प्राप्त विषयांचा सविस्तर आढावा अहवाल तयार करून म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in