Demolition Of Karnak Bridge Completed: अखेर कर्नाक पुलाचं पाडकाम पूर्ण; मध्य रेल्वे पूर्ववत

मुंबईतील (Mumbai Local) कर्नाक पुलाचे पाडकाम हे पूर्ण झाली असून मध्य रेल्वेवरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेकडून दिली आहे
Demolition Of Karnak Bridge Completed: अखेर कर्नाक पुलाचं पाडकाम पूर्ण; मध्य रेल्वे पूर्ववत

मुंबईची लाईलाईन असलेल्या मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमे आहे. अखेर कर्नाक पुलाचे पाडकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. दुपारी चार वाजता पुलाच्या कामानंतर सीएसएमटी ते ठाणे लोकल धावायला सुरुवात झाली. हार्बर लाईनवरील वाहतूकही लवकरच सुरु करणार असल्याची माहिती देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाक पुलाचे पाडकाम शनिवारी रात्री ११ पासून सुरु झाले. १८६८मध्ये बनवण्यात आलेला हा पूल आता पाडण्यात आला. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी माहिती देताना सांगितले की, अतिशय काटेकोरपणे नियोजनबद्ध पद्धतीने २७ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये १७ तासातच मेन लाईनची लोकल सेवा सुरु करण्यात आली. तसेच हार्बर लाईनची लोकल सेवा ठरलेल्या वेळेनुसार म्हणजेच रात्री ८ वाजता सुरु केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in