Narayan Rane : नारायण राणे यांनी अखेर स्वतःच बांधकाम पाडायला केली सुरुवात

मुंबई हायकोर्टाने नारायण राणे यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि बांधकाम हटवण्याची नोटीस दिली
Narayan rane
Narayan rane
Published on

मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) अनधिकृत बांधकामाविरूद्ध नोटीस पाठवण्यात आली होती. आदेशानंतर त्यांनी स्वतःच अधीश (Adhish Bungalow) बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात केली. पुढील सात-आठ दिवसांत हे अनधिकृत बांधकाम तोडले जाणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा 'अधिश' बंगला जुहू येथे समुद्र किनारी आहे. तो अनधिकृतरित्या असल्याने मुंबई हायकोर्टने बांधकाम हटवण्याचा आदेश दिले. बंगल्यामधील अनधिकृत भाग काढून नकाशा पाहून नियमामध्ये बांधकाम केले जाणार आहे. हे प्रकरण कोर्टात गेले होते. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध  तक्रार मुंबई मनपाला केली होती. या संदर्भात कारवाई करत मुंबई हायकोर्टाने नारायण राणे यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि बांधकाम हटवण्याची नोटीस दिली. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कारवाई करण्याच्या आधीच नारायण राणे यांनी स्वत:हून बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in