मुंबईत डेंग्यूचा डंका; सहा महिन्यांत ४३ हजार एडिस डासांच्या अळ्या

मुंबईत डेंग्यूचा डंका; सहा महिन्यांत ४३ हजार एडिस डासांच्या अळ्या

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यूचा धोका वाढला आहे. जानेवारी ते जून मध्यापर्यंत डेंग्यूचा प्रादुर्भाव कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांची ४३ हजार ४२८ उत्पत्तीस्थाने आढळली आहेत.
Published on

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यूचा धोका वाढला आहे. जानेवारी ते जून मध्यापर्यंत डेंग्यूचा प्रादुर्भाव कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांची ४३ हजार ४२८ उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. दरम्यान, मुंबईसह राज्यात साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली, त्यावर उदय सामंत यांनी स्पष्ट केले. पावसाळी आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. गेल्या वर्षी १४ मृत्यू डेंग्यूची लागण झाल्याने झाले होते, मात्र यंदा डेंग्यूने एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.

डेंग्यू या आजाराबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. गेल्या वर्षी १ लाख ३१ हजार ९८० एडिस डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली होती. यंदा ४३,४२८ एडिस डासांची उत्पत्तीस्थाने आतापर्यंत नष्ट केली आहेत. अळीनाशक फवारणीदेखील केली आहे. तसेच डेंगूचा प्रादुर्भाव हा राज्यभरात दिसतो.

logo
marathi.freepressjournal.in