उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई बँकेच्या धारावी शाखेचे शनिवारी उद्घाटन

या उद्घाटन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, तर प्रमुख उपस्थिती भाजप गटनेते उपस्थिती यांची लाभणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई बँकेच्या धारावी शाखेचे शनिवारी उद्घाटन
Published on

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पर्ल रेसिडेन्सी, शॉप नं. २ आणि ३ तळमजला, डी विंग, बाबू जगजीवन राम नगर, संत रोहिदास मार्ग धारावी येथील नवीन शाखेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, तर प्रमुख उपस्थिती भाजप गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांची लाभणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, संचालक आणि आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील राऊत, संचालक नंदकुमार काटकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, कार्यकारी संचालक डी. एस. कदम यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in