Devendra Fadanvis : 'त्यांनी' ही सवय सोडायला हवी; नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुंबईच्या विकासकामाचे उदघाटन करताना केली विरोधकांवर टीका
Devendra Fadanvis : 'त्यांनी' ही सवय सोडायला हवी; नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस?

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते काही विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मुंबईतील (Mumbai) विकासकामांवरून होणाऱ्या श्रेयवादावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "उद्या मुलाचा एखाद्या शाळेत प्रवेश झाला, तरी तो आमच्यामुळेच झाला. अरे नोकरी लागली, मीच लावली. अरे लग्न झाले, मीच जुळवून दिले, किंवा कोणाला मुलगा झाला तरी तो माझ्यामुळेच झाला, अशी म्हणणारी ही लोकं आहेत. म्हणून त्यांनी ही प्रवृत्ती सोडायला हवी." अशी टीका विरोधकांवर केली आहे.

"आपण कोणतेही काम सुरू केले, तर काही लोक म्हणतात आमच्याच काळात झाले. मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला, तर मीच हे काम केले, असा दावा करतात. जे लोक अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्ष घरातच बसून होते, त्यांनी आम्हीच हे काम हाती घेतले असं बोलणं हस्यास्पद आहे." असं खोचक टोला त्यांनी लगावला आहे. पुढे त्यांनी मुंबईकरांची माफीदेखील मागितीला. ते म्हणाले की, "एकाच वेळी अनेक कामे काढल्यामुळे, मुंबईकरांना त्याचा त्रास होत आहे. पण थोडे दिवस हा त्रास सहन करा."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in