पत्नीसह मेहुणीशी जवळीक वाढविणे जिवावर बेतले

चौकशीत त्यानेच अनिकेतची हत्या केल्याची कबुली दिली
पत्नीसह मेहुणीशी जवळीक वाढविणे जिवावर बेतले

मुंबई : खार येथे अनिकेत मोहिते या तरुणाची त्याच्याच मित्राने जड वस्तूने डोक्यात मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली. हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपी मित्राला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली आहे. अनिल मनोज वाघेला ऊर्फ पापू असे या ३२ वर्षांच्या आरोपीचे नाव असून, याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पत्नीसह मेहुणीशी जवळीक वाढविणे अनिकेतच्या जिवावर बेतल्याचे बोलले जाते. स्वप्निल मोहिते हा खार येथे राहत असून, त्याचा लहान भाऊ अनिकेत हा काहीच कामधंदा करत नाही. ३० ऑक्टोबरला त्याच परिसरात राहणाऱ्या अनिल वाघेलाने त्याची मेहुणी शाहिस्तासोबत अनिकेतची ओळख करून दिली होती. या ओळखीनंतर अनिकेतची त्याच्या पत्नी आणि मेहुणीसोबत जवळीक वाढत असल्याचे दिसून आले होते. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी अनिलने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी सकाळी सहा वाजता अनिल तिथे आला आणि त्याने झोपेतच त्याच्या डोक्यात जड वस्तूने मारहाण केली होती. चौकशीत त्यानेच अनिकेतची हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in