मुंबईत डेंग्यूच्या डासांचा शोध, हाय रिस्क एरियात झाडाझडती; पावसाळ्यापूर्वी कीटकनाशक विभागाने कंबर कसली

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने आतापासून कंबर कसली आहे.
मुंबईत डेंग्यूच्या डासांचा शोध, हाय रिस्क एरियात झाडाझडती; पावसाळ्यापूर्वी कीटकनाशक विभागाने कंबर कसली
Published on

मुंबई : पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने आतापासून कंबर कसली आहे. डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस डासांचा शोध घेण्यासाठी विशेष करून स्लम एरियावर लक्ष केंद्रीत केले आहे. अधिकचे मनुष्यबळ घेत संपूर्ण एरिया पिंजून काढण्यात येणार असून, ज्या ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती स्थाने निदर्शनास येतील, अशा ठिकाणी प्रथम समज, नंतर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

अपुरी नालेसफाई, खड्डेमय रस्ते, कचऱ्याचे ढीग अशा आरोपापासून बचाव करण्यासाठी यंदा मुंबई महापालिकेने प्रत्येक काम वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार रोखण्यासाठी कीटकनाशक विभागाने अडगळीच्या ठिकाणांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यापासूनच ही मोहीम हाती घेतली जाणार असून, दर १५ दिवसांनी वॉर्ड स्तरावर झाडाझडतीचा आढावा घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी एडिस डासांच्या उत्पत्ती स्थानांचा शोध लागेल त्यांना स्वच्छता राखणे, स्वच्छ पाणी साठवून ठेऊ नये, अशा सूचना करण्यात येणार आहेत. पालिकेच्या सूचनेनंतर ही दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खासगी, सरकारी जागा रडारवर

पावसाळी आजार रोखण्यासाठी खासगी व सरकारी जागांमध्ये भंगार सामान, स्वच्छ पाणी साचले का याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर विभागी लिस्ट तयार करण्यात येईल आणि मांसक्युटी अव्हरनेन्स कमिटीला सादर करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in