देवनागरी लिपित मराठी पाट्या लावाच! दोन दिवसांत ३३७ दुकाने व आस्थापनांवर कारवाई ६,५०० दुकाने व आस्थापनांची झाडाझडती

दुकाने व आस्‍थापनांवरील मराठी नामफलकांच्‍या तपासणीकामी दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांची पथके तैनात केली आहेत.
देवनागरी लिपित मराठी पाट्या लावाच! दोन दिवसांत ३३७ दुकाने व आस्थापनांवर कारवाई
६,५०० दुकाने व आस्थापनांची झाडाझडती

मुंबई : दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर देवनागरी लिपीत दिसतील अशापद्धतीने मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी संघटनेची याचिका फेटाळल्याने मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत ६,५०७ दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेतली असता, ३३७ ठिकाणी मराठी पाट्या नसल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दुकाने व आस्‍थापनांवरील मराठी नामफलकांच्‍या तपासणीकामी दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांची पथके तैनात केली आहेत. या पथकांनी मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी ३ हजार २६९ दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेतली. यात मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात ३ हजार ९३ नामफलक आढळले. तर, मात्र सर्वोच्च न्यायालयाचे तसेच कायद्यातील निर्देश या आधारे अनुपालन न केलेल्या १७६ दुकाने व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

बुधवारी या पथकाने एकूण मिळून ३ हजार ५७५ दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेतली असता, देवनागरी लिपित, ठळक अक्षरात ३ हजार ४१४ नामफलक आढळले. तर १६१ दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या नसल्याने कारवाई करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in