बाणगंगेचा विकास रखडणार; सुशोभीकरणासाठी कंत्राटदाराचा शोध

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बाणगंगा परिसरात पायऱ्यांची तोडफोड केल्याने संबंधित कंत्राटदाराला बाहेरचा रस्ता दाखवत मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाणगंगेचा विकास रखडणार; सुशोभीकरणासाठी कंत्राटदाराचा शोध
Published on

मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बाणगंगा परिसरात पायऱ्यांची तोडफोड केल्याने संबंधित कंत्राटदाराला बाहेरचा रस्ता दाखवत मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंत्राटदारावर कारवाई केल्याने उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने नवीन कंत्राटदाराचा शोध सुरू केला आहे; मात्र कंत्राटदाराची वेळीच नियुक्ती न झाल्यास काम रखडण्याची शक्यता वाढली आहे.

ऐतिहासिक अशा बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आतमध्ये एक्सकॅव्हेटर संयंत्र उतरवून तलावांच्या पायऱ्यांचे नुकसान केल्याने संबंधित कंत्राटदारास पालिकेने यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात २५ जून २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हानी पोहोचलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे हाती घेत त्याचदिवशी त्वरित पूर्ववत करण्यात आली आहेत. तसेच यापुढच्या काळात उर्वरित कामेही पूर्ण करण्यात येणार आहेत.

दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील ऐतिहासिक बाणगंगा

तलाव परिसर व १६ मंदिरांची वाराणसीच्या धर्तीवर भक्ती परिक्रमा मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले असून, तीन टप्प्यात पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचे काम होणार आहे. चार मजली हेल्थ सेंटर, चेजिंग रूम आपला दवाखाना अशा सुविधा भक्तांसह पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील एक दीड वर्षांत बाणगंगा तलाव पर्यटकांचे आकर्षण ठरणार, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in