देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाल्यानंतर आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
Published on

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाल्यानंतर आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त असलेले देवेन भारती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.

फणसाळकर सेवानिवृत्त झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, देवेन भारती यांची या पदी नियुक्ती करण्यात आली. देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त म्हणून काम केलेले आहे. शिवाय गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त, उपायुक्त म्हणून त्यांनी काम केलेले आहे. महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख यांसारखी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in