विरोधी पक्षातील नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार करणारे एक पत्र लिहिले
विरोधी पक्षातील नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

देशभरातील विरोधाची पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले. यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार केली. तसेच, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना क्लीनचित देण्यात येते, असा गंभीर आरोपदेखील भाजपवर करण्यात आला. यावरून आता भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "जे गैरमार्गाने पैसे कमवतात, त्यांच्यावरच कारवाई केली जाते." असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर; देशभरातील 'या' ९ बड्या नेत्यांचे पंतप्रधानांना पत्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर म्हणाले की, "कुठेही यंत्रणांचा गैरवापर होत नाही. जे गैरमार्गाने पैसे कमवत आहेत, त्यांच्यावरच कारवाई होत आहे. यामध्ये कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही. असे पत्र लिहून कोणाचीही सुटका होणार नाही. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने पैसे कमावणे बंद झाले पहिजे. आणि मुळातच भाजपमध्ये आल्यावर कोणाचीही कारवाई बंद झालेली नाही, असे असेल तर विरोधकांनी उदाहरण द्यावीत. जर कारवाई चुकीची झाली असेल तर त्यांच्यासाठी न्यायालय आहेच. चुकीचे घडत असले तर तिथे न्याय मिळेल." असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in