भारत स्वतःची परराष्ट्र धोरणे स्वतः ठरवतो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे काय म्हणतात याच्याशी काहीही संबंध नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते आहेतच, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी म्हणाले. भारत स्वतः स्वतःची परराष्ट्र धोरणे ठरवतो, ती कोणत्याही दुसऱ्या देशाच्या इशाऱ्यावर ठरवली जात नाहीत, असेही फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
भारत स्वतःची परराष्ट्र धोरणे स्वतः ठरवतो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने
Photo : X
Published on

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे काय म्हणतात याच्याशी काहीही संबंध नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते आहेतच, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी म्हणाले. भारत स्वतः स्वतःची परराष्ट्र धोरणे ठरवतो, ती कोणत्याही दुसऱ्या देशाच्या इशाऱ्यावर ठरवली जात नाहीत, असेही फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

ट्रम्प यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. मी नेहमीच नरेंद्र मोदी यांचा मित्र राहीन, ते एक महान पंतप्रधान आहेत. पण सध्या मोदींची भूमिका मला पटलेली नाही, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या या विधानानंतर फडणवीस यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. कारण ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील टॅरिफ दुप्पट करून ५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. तसेच २५ टक्के अतिरिक्त कर लावला आहे. भारताने अमेरिकेच्या या निर्णयाला अन्यायकारक, अयोग्य आणि अवास्तव असे म्हटले आहे.

यासंदर्भात विचारले असता, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ट्रम्प काय म्हणतात याने काही फरक पडत नाही. मोदी हे महान आहेतच. जगभरातील नेतेही त्यांना एक महान नेता मानतात. हा नवी भारत आहे. मोदी यांचा भारत. आपण स्वतः स्वतःची परराष्ट्र नीती ठरवतो, कोणीही आपल्यावर ती लादू शकत नाही. 'विकसित भारत' बनण्याच्या दिशेने वाटचाल करत राहील, असेही त्यांनी नमूद केले.

'वर्षा'वरील बाप्पाचे विसर्जन

फडणवीस हे दक्षिण मुंबईतील 'वर्षा' या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बसवलेल्या गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर पत्रकारांशी बोलत होते. येथेच कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, आपण सर्वजण बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देतो. तसेच पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणतो.

logo
marathi.freepressjournal.in