'चिंचपोकळीचा चिंतामणी'च्या कार्यकर्त्यांकडून भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

गणेश कार्यशाळेतून वाजतगाजत ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’ची आगमन मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू झाली आहे
'चिंचपोकळीचा चिंतामणी'च्या कार्यकर्त्यांकडून भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

‘चिंचपोकळीचा चिंतामणी’च्या आगमन मिरवणुकीत धुडघूस घातल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मंडळाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत.

दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी काही दिवस आधी गणेश कार्यशाळेतून वाजतगाजत ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’ची आगमन मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू झाली आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत. काही वर्षांपूर्वी हुल्लडबाजांनी मिरवणुकीत गोंधळ घालत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली. आगमन मिरवणुकीत हुल्लडबाजांनी महिलांची छेडछाड केली, पाण्याच्या बाटल्या-चप्पल मिरवणुकीत सहभागी आणि बघ्यांच्या दिशेने भिरकावून उपद्रव केला; मात्र प्रचंड गर्दीमुळे पोलीसही हतबल झाले होते. आता याच मंडळाच्या पाच-सहा कार्यकर्त्यांनी ‘चिंतामणी’चे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर दिसू लागली आहे. मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळच हा प्रकार घडला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in