Mumbai : माचिस न दिल्यामुळे धारावीत एकाची हत्या; तीन अल्पवयीन मुले ताब्यात

धारावी परिसरात फुटपाथवर झोपलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी धारावी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
माचिस न दिल्यामुळे धारावीत एकाची हत्या; तीन अल्पवयीन मुले ताब्यात
माचिस न दिल्यामुळे धारावीत एकाची हत्या; तीन अल्पवयीन मुले ताब्यातप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मेघा कुचिक/मुंबई

धारावी परिसरात फुटपाथवर झोपलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी धारावी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. माचिस देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केले आहे.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. धारावीत २३ मार्चला ही घटना घडली. पोलीस निरीक्षक संगीता माने गस्तीवर असताना त्यांना सायन-वांद्रे लिंक रोडवरील धारावी टी-जंक्शनजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. त्याच्या डोक्याला, कपाळाला आणि कानाजवळ गंभीर जखमा होत्या. त्याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात जड वस्तूने डोक्यावर प्रहार केल्यामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नोंदवले. तपासादरम्यान वांद्रे पूर्व येथील निर्मलनगर परिसरातून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

तिन्ही मुले व्यसनाधीन

ताब्यात घेतलेली तिन्ही मुले अमली पदार्थांच्या आहारी गेलेली आहेत. घटनेच्या रात्री त्यांनी फुटपाथवर झोपलेल्या या व्यक्तीकडे माचिस मागितली होती. मात्र, त्याने माचिस देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलांनी धारदार शस्त्राने व पेव्हर ब्लॉकने त्याच्यावर हल्ला केला. घटनास्थळावरून रक्ताने माखलेला पेव्हरब्लॉक जप्त करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in