धारावीचे ट्विन मॅपिंग तंत्रज्ञानाने नकाशे तयार होणार ;अदानी समूहाकडून जेनेसिस इंटरनॅशनलची नियुक्ती

डिजिटल ट‌्विन मॅपिंगमुळे इमारती, वाहने, मशिन्स, कोणते व्यवसाय या भागात येणार याचे चित्र आभासी पद्धतीने तयार केले जाते.
धारावीचे ट्विन मॅपिंग तंत्रज्ञानाने नकाशे तयार होणार ;अदानी समूहाकडून जेनेसिस इंटरनॅशनलची नियुक्ती
PM
Published on

मुंबई : भारतातील नकाशे बनवणाऱ्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी जेनेसिस इंटरनॅशनलची अदानी समूहाच्या पोर्टसमाऊथ बिल्डकॉन प्रा. लिमिटेडला ‘डिजिटल ट्विन मॅपिंग टेक्नॉलॉजीसाठी नियुक्ती केली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी हे काम केले जाईल. हे काम २२ कोटी रुपयांचे आहे.

हा प्रकल्प नऊ महिन्यांचा असून त्यातून धारावीचे चित्र बदलणार आहे. कंपनीचे ‘ऑयस्टर ३ डी मॅप’ हे नावीन्यपूर्णता व अचुकतेसाठी वापरले जातात. या प्रकल्पात हे नकाशे महत्त्वपूर्ण ठरतील. जिनेसिसने सर्व्हे ऑफ इंडियाशी करार केल्यानंतर हे धारावीचे कंत्राट झाले. यात ३ डी डिजिटल ट‌्विन मॅपिंग नकाशे केले जातील. सरकारी-खासगी भागीदारीतून पहिल्यांदाच ३ डी डिजिटल ट‌्विन मॅपिंगचा प्रकल्प राबवला जात आहे.

जिनेसिस इंटरनॅशनलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक साजीद मलिक म्हणाले की, डिजिटल ट‌्विन मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर हा अतिशय आव्हानात्मक परिसरात केला जातो. सामाजिक व वित्तीय सर्वंकषतेमुळे या परिसरातील जनतेच्या जीवनाचा कायापालट होतो. यापूर्वी भारतात जिनेसिसने डिजिटल ट‌्विन मॅपिंगचा प्रयोग जयपूर, अयोध्या, अहमदाबाद, सुरत शहरात केला आहे. मात्र, संपूर्ण देशासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे सौदी सरकारने मक्का या पवित्र शहराच्या डिजिटल ट‌्विन मॅपिंगचे काम जिनेसिसला दिले आहे.

डिजिटल ट‌्विन मॅपिंग म्हणजे काय?

डिजिटल ट‌्विन मॅपिंगमुळे इमारती, वाहने, मशिन्स, कोणते व्यवसाय या भागात येणार याचे चित्र आभासी पद्धतीने तयार केले जाते. मालमत्तेची एक समान आभासी प्रत तयार करणे आणि त्याच्या कार्यप्रदर्शनाचे निरीक्षण करणे, विविध परिस्थितींचे अनुकरण करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी डेटाचे विश्लेषण करणे आदींचा वापर केला जातो.

धारावीसारख्या अनियोजित भागाचा नकाशा तयार करण्याबाबत मलिक म्हणाले की, कंपनीने यापूर्वी डिजिटल ट‌्विन मॅपिंगचे काही काम एसआरए प्राधिकरणासाठी केले आहे. मात्र, धारावीसाठी हे काम करणे पहिल्यांदाच होत आहे. आम्हाला हे काम ९ महिन्यांत संपवायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

जिनेसिसने ‘न्यू इंडिया मॅप’ तयार केला आहे. त्यात ग्राहक, लॉजिस्टीक, वाहन व पायाभूत सुविधा आदींचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in