जेएन व्हेरिएंटचा धास्ती ;कामा, सेंट जॉर्ज, सरकारी रुग्णालयसह खासगी रुग्णालये अँक्टीव्ह

कोरोनाचा उपप्रकार ओमायक्रॉनचा उपप्रकार जेएन व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात व ठाण्यात एक जेएन व्हेरिएंटचा आढळला आहे.
जेएन व्हेरिएंटचा धास्ती ;कामा, सेंट जॉर्ज, सरकारी रुग्णालयसह खासगी रुग्णालये अँक्टीव्ह
Published on

मुंबई :  ओमायक्रॉनचा उपप्रकार जेएन व्हेरिएंट मुंबईच्या वेशीवर आल्याने मुंबई महापालिकेसह सरकारी रुग्णालये व खासगी रुग्णालये सज्ज झाली आहेत. कामा, सेंट जॉर्ज, जिटी रुग्णालयासह खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड राखीव ठेवण्यात आले असून गरजेनुसार बेड्सची संख्या वाढवण्यात येणार आहेत.

कोरोनाचा उपप्रकार ओमायक्रॉनचा उपप्रकार जेएन व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात व ठाण्यात एक जेएन व्हेरिएंटचा आढळला आहे. मुंबईच्या एंट्री पाईटवर जेएन व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्याने मुंबई महापालिकेसह सरकारी रुग्णालये सज्ज झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या निर्देशानुसार कामा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी २० बेड्सचा स्वतंत्र वॉर्ड राखीव ठेवण्यात आल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.  तुषार पालवे यांनी सांगितले.

मुंबईत १४६ खासगी रुग्णालये असून, प्रत्येक रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयात आयसूलेशन, आयसीयू बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार बैड्सची संख्या वाढण्यात येईल, असे खासगी रुग्णालयाचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले.

पॅनिक होण्याची गरज नाही

जेएन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा उपप्रकार आहे. त्यामुळे लोकांनी पॅनिक होण्याची गरज नाही. ताप खोकला सर्दी अशी लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करून घ्यावे.

- डॉ. गौतम भन्साळी, समन्वयक, खासगी रुग्णालय

'असे' बेड्स राखीव

कामा रुग्णालय - २०

सेंट जॉर्ज - ५०

logo
marathi.freepressjournal.in