‘धूम’चे दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन

निधनाबद्दल चित्रपट क्षेत्रातील विविध अभिनेते, अभिनेत्री, मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
‘धूम’चे दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन
Published on

मुंबई : ‘धूम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे रविवारी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा, असे त्यांच्या कन्या संजिनी यांनी सांगितले.

यशराज फिल्म्सच्या ‘धूम’चे दिग्दर्शन त्यांनी केले होते. तसेच २००६ मध्ये ‘धूम २’ चे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. त्यांनी २००० मध्ये ‘तेरे लिये’ या तित्रपटाद्वारे प्रथम दिग्दर्शन सुरू केले. त्यानंतर मेरे यार की शादी है हा २००२ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन कन्या असा परिवार आहे. त्यांची कन्या संजिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय यांना काही त्रास नव्हता, ते निरोगी होते. नेमके काय झाले मला सांगता येणार नाही मात्र बहुतेक त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा. त्यांच्या निधनाबद्दल चित्रपट क्षेत्रातील विविध अभिनेते, अभिनेत्री, मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in