बेस्टच्या ताफ्यात पुन्हा डिझेल बसेस ; १५० वातानुकूलित मिनी बसेस भाडेतत्त्वावर घेणार

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सद्यस्थितीत ३,२२८ बसेस आहेत. यापैकी १,६४६ बसेस बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या असून १,५८२ बसेस भाडेतत्त्वावरील
बेस्टच्या ताफ्यात पुन्हा डिझेल बसेस ; १५० वातानुकूलित मिनी बसेस भाडेतत्त्वावर घेणार

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रीक बसेसना पसंती दिली; मात्र आता इलेक्ट्रीक बसेस एवजी डिझेलवर धावणाऱ्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. यासाठी बेस्ट उपक्रमाने निविदा मागवल्या असून, १५० वातानुकूलित डिझेल बसेस खरेदी करणार आहे.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्ट उपक्रमाकडे ३,२२८ बसेस असून, २०२६ पर्यंत १० हजार बसेसचा समावेश बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात होणार आहे. विशेष म्हणजे, १० हजार बसेस पर्यावरणपूरक असतील असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे. मात्र बेस्ट उपक्रमाने डिझेलवर धावणाऱ्या मिनी वातानुकूलित बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला पर्यावरणाचा विसर पडला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सद्यस्थितीत ३,२२८ बसेस आहेत. यापैकी १,६४६ बसेस बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या असून १,५८२ बसेस भाडेतत्त्वावरील आहेत. यामध्ये डिझेल वर धावणाऱ्या ५७० बसेस असून आणखी १५० वातानुकूलित डिझेल वर धावणाऱ्या बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ताफ्यातील कमतरता भरून निघेल

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बेस्ट उपक्रमातील एका कंत्राटदाराने आपली बेस्टमधील बस सेवा थांबवली होती. त्यामुळे त्याच्याकडील २७५ बसगाड्या या बस ताफ्यातून कमी झाल्या. त्यामुळे बसगाड्याअभावी बेस्टला मुंबई शहर व उपनगरातील अनेक बसमार्ग बंद करावे लागले होते. या नव्या बसगाड्या आल्या तर बेस्ट बस ताफ्यातील कमतरता भरून निघेल व प्रवाशांची चांगली सोय होईल, असा विश्वास बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in