
मुंबई : पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीवर भर दिला जात असून विद्यार्थ्यांचे डिजिटल रोबोटिक स्किलिंग, ग्रीन स्कूल, टेरेस फार्मिंग, द स्मायलिंग स्कूल प्रोजेक्ट अशा लनिॅग २.० अभिनव उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री व मुंबई शहराचे पालक मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वुलन मिल पालिकेची एमपीएस शाळा दादर येथे करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग, प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने रीड मुंबई, ग्रीन स्कूल -टेरेस फार्मिंग, विद्यार्थ्यांचे डिजिटल, रोबोटीक स्किलिंग, द स्मायलिंग स्कूल प्रोजेक्ट हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शिक्षण विभागाचा डॅशबोर्डचा समावेश असलेल्या लनिॅग २.० या अभिनव उपक्रम आहे. केसकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी मुंबई महापालिकेचे सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, राज्याचे उप संचालक (शिक्षण ) तथा शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक व खाजगी अनु. शाळा ) राजू तडवी, प्रोजेक्ट मुंबई संस्थापक सदस्य व संचालक शिशिर जोशी उपस्थित होते.