Dinesh Phadnis: CID फेम अभिनेता दिनेश फडणीस काळाच्या पडद्याआड; तुंगा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

यकृत निकामी झाल्याने दिनेश फडणीस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
Dinesh Phadnis: CID फेम अभिनेता दिनेश फडणीस काळाच्या पडद्याआड; तुंगा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Published on

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय 'सीआयडी' या शोमध्ये 'फ्रेडी'ची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस हे मागील काही दिवासांपासून आजाराने ग्रस्त असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची आजाराशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आहे. काल रात्री म्हणजेच ४ डिसेंबर रोजी दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, 1 डिसेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना ताबोडतोब मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुंगा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दिनेश यांचे सहकलाकार आणि 'सीआयडी' अभिनेता दयानंद शेट्टी यांनी सांगितल की, यकृत निकामी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज ५ डिसेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. 'सीआयडी' या प्रदीर्घ काळ चालणार्‍या मालीकेची संपूर्ण स्टारकास्ट त्यांच्या निवासस्थानी पोहचली आहे.

दिनेश फडणीस यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाहते आणि कलाकार पोस्ट शेयर करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दिनेश फडणीस यांनी 'सीआयडी'मध्ये अनेक वर्षे काम केले आहे. 1998 ते 2018 पर्यंत त्यांनी फ्रेडरिकची भूमिका साकारली. याशिवाय 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्येही ते एका छोट्या भूमिकेत दिसले होते. शोमधील त्यांची फनी स्टाइल सर्वांनाच आवडली. इतकंच नाही तर सीआयडी व्यतिरिक्त दिनेश यांनी अदालत, सीआयडी स्पेशल ब्युरो, तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध मालिकांमध्येही अभिनय केला आहे. याशिवाय ते आमिर खानच्या चित्रपट 'सरफरोश' आणि हृतिक रोशनच्या 'सुपर ३०'मध्येही दिसले होते.

logo
marathi.freepressjournal.in