जनतेचा पोलिसांवर अविश्वास; महासंचालक रश्मी शुक्ला यांची जनतेसमोर जाहीर कबुली

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जनतेचा पोलिसांवर अविश्वास; महासंचालक रश्मी शुक्ला यांची जनतेसमोर जाहीर कबुली

मुंबई : जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झाल्याची कबुली महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जाहीर पत्राद्वारे दिली आहे. शुक्ला यांनी पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारून महिना झाला. त्यांनी सोशल मीडियावर राज्यातील जनतेला पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर अपलोड केले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे हे पत्र चर्चेत आहे.

त्या म्हणाल्या की, भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास जिंकण्याची आमची जबाबदारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की, आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, राज्यातील सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहतील.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in